मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यानंतर वर्षावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये तातडीची बैठक...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण आणि रायगडला मोठा फटका बसलाय. अशात कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.

मुंबई - महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण आणि रायगडला मोठा फटका बसलाय. अशात कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रायगडमधील अलिबागला जाऊन वादळानंतरचा आढावा घेतला. तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. 

त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर बैठक सुरु आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरु असल्याची माहिती मिळतेय.

मोठी बातमी - मुंबई महापालिकेचा 'हा' हेल्पलाईन नंबर नोंद करुन ठेवा

काल शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यात बैठक पार पडली होती. कोकण आणि रायगडला आता मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज भासणार आहे. अशात याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणं अपेक्षित होतं.

अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आपला अलिबाग दौरा संपवून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होतेय. आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांसोबत अलिबागला गेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित असण्याची  शक्यता वर्तवण्यात येतेय. 

बातमी अपडेट होत आहे.... 

 

CM uddhav thackeray and sharad pawars meeting at varsha bungalow

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thackeray and sharad pawars meeting at varsha bungalow