esakal | डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल | Asish shelar
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Ashish-Shelar

डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई : सध्या आरोग्य मंदिरांचीच गरज असून इतर मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील, असे म्हणत मंगळवारी (ता. ७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) टोला लगावला होता. त्यावर राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब (Pub) ही आरोग्य केंद्र (health center) आहेत का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केला आहे.

हेही वाचा: महिलांसाठी बेस्टची विशेष सेवा; अर्थसंकल्पात तरतूद

कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, सॅनिटायझर वाटप या सगळ्यांमध्ये काही कमिशनची प्रकरणे समोर येत आहेत. त्यावर मुख्यमंत्री कधी भाष्य करणार, असा प्रश्नही शेलार यांनी केला. मॉलमधील कामगारांचे कारण सांगून मॉल उघडे केले; मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फूल विकणारे यांची उपासमार मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, असे शेलार यांनी विचारले. भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचे काम शिवसेना करत आहे.

भक्तांची देवापासून ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून कोरोना बंदीचा कार्यक्रम नाही; तर देऊळबंदीच शिवसेनेचे अभियान आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली. ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा सहा महिन्यांत मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तेथील आरोग्य व्यवस्था कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला.

loading image
go to top