esakal | महिलांसाठी बेस्टची विशेष सेवा; अर्थसंकल्पात तरतूद | BEST
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

महिलांसाठी बेस्टची विशेष सेवा; अर्थसंकल्पात तरतूद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट (BEST) उपक्रमामार्फत पुढील आर्थिक वर्षात महिलांसाठी (women's) विशेष बस (special bus) सुुरू करण्याबरोबरच आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी खास मोबाईल ॲप्लिकेशन (mobile application) तयार करण्यात येणार आहे. बेस्टच्या २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात (Budget) यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट नोकरदारांसाठीही विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai : साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

बेस्टचा अर्थसंकल्प आज बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात तेजस्विनी बसच्या धर्तीवर गर्दीच्या मार्गावर महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विमानतळ ते वांद्रे-कुर्ला संकुल आणि नरिमन पॉईंट अशी वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. विविध कंपन्या, कॉल सेंटर आणि शाळांच्या मागणीनुसारही बस सुविधा पुरविल्या जातील, अशी घोषणा महाव्यस्थापकांनी केली.

प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी बेस्ट प्रशासन मोबाईल ॲप्लिकेशन तयार करत आहे. त्यात विशेष बटण ठेवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत माहिला प्रवाशांना मदत पोहचविण्यासाठी त्याची मदत होणार आहे, असेही बेस्ट महाव्यस्थापकांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर बेस्टमध्ये सीसी टीव्ही कॅमरेही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठा दिलासा!
सध्या बेस्टच्या भाड्याच्याच लहान बस जास्त प्रमाणात धावत आहे. त्यात आसने कमी असल्याने महिला प्रवाशांना दाटीवाटूत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवांची संख्या वाढल्यास त्याचा मोठा दिलासा महिलांना मिळणार आहे. यासाठी मार्गाचे निरीक्षण करून बसची संख्या व वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे.

loading image
go to top