"तर मला द्यावा लागेल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा".; उद्धव ठाकरेंनी केला पंतप्रधानांना फोन...

"तर मला द्यावा लागेल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा".; उद्धव ठाकरेंनी केला पंतप्रधानांना फोन...

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं खरं मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे विधान परिषदेच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यातल्या आहेत. त्यामुळे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना आमदारकी मिळाली नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो की काय अशी चिन्हं दिसतायेत. म्हणूनच "काहीतरी करा नाहीतर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल" असा फोन त्यांनी नरेंद्र मोदींना केल्याची माहिती मिळतेय.

विधान परिषदेच्या निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर गेल्या आहेत. त्यात जर मुख्यमंत्रयंनी शपथ घेतल्याच्या ६ महिन्यांच्या आत त्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो असा नियम आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिलाय.

राज्य सरकारला स्थिरता देण्यासाठी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करून राज्यपालांना पाठवण्यात आला होता. मात्र त्यावर काहीही निर्णय झाला नाही. त्यानंतर पुन्हा राज्यपालांना यासंदर्भात आठवण करून देणारा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाहीये.

त्यामुळे राज्यात कोरोनाचं महाभयंकर संकट असताना राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधानांना फोनवरून म्हंटलंय. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यांनतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केल्याची माहिती मिळतेय. तर "आपण या प्रकरणाकडे नक्कीच लक्ष देऊ" असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय अशी माहिती मिळतेय. त्यामुळे आता राज्य सरकार पुढचा पेच सुटणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे.

CM uddhav thackeray called PM narendra modi read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com