esakal | गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (corona third wave) थोपवायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण (corona vaccination) होणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत आपण गणेशोत्सव (Ganpati Festival) साजरा करू. प्रभागा प्रभागात गणेश मंडळाचे काम असते. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्या (vaccination permission) जेणेकरून प्रभागा प्रभागातील नागरिकांचे लसीकरण होईल अशी मागणी शिवसेना युवासेनेचे अनमोल म्हात्रे (Anmol Mhatre) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व राज्याच्या आरोग्य विभागास केली आहे.

हेही वाचा: शिवसेने सोबत युती हीच भाजपाची सर्वात मोठी चूक : गणपत गायकवाड

लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांनी एकत्र यावे याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. परंतु गेल्यावर्षी पासून कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना, मंडळांना मनात असूनसुद्धा गणेशोत्सव एकत्रीत साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल झाले आहेत. साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य शासनाने देऊ केली आहे. सध्या गरज ही नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याची आहे.

त्यातच कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा यामुळे आजही अनेक नागरिक लसच्या पहिल्या डोस पासून वंचित आहेत. गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळास लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिल्यास प्रभागातील नागरिकांनाही सोयीचे होऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सेवकांचा भारही कमी होईल. त्यासाठी लागणारा लस साठाही महापालिका प्रशासनास उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवली पश्चिमेचे युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.

loading image
go to top