esakal | शिवसेने सोबत युती हीच भाजपाची सर्वात मोठी चूक : गणपत गायकवाड
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शिवसेने सोबत युती हीच भाजपाची सर्वात मोठी चूक : गणपत गायकवाड

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भाजपा (BJP) सरकारच्या काळात कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महापालिकेत 3 ते 4 हजार कोटींच्या पुढे निधी आला. मात्र सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि त्यांच्या तालावर नाचणारे पालिका (Municipal) प्रशासनाने कामाचा कार्यादेशच काढला नाही. कुरघोडीच्या राजकारणात निधीच वापरता आलेला नाही. सेनेसोबत केलेली युती हीच भाजपाची (BJP) सर्वात मोठी चूक होती असे सांगत भाजपा (BJP) आमदार(MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी सेनेवर हल्लाबोल केला.

कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्यावतीने कल्याण पूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत शुक्रवारी आयोजित चर्चासत्रात आमदारांनी कल्याण डोंबिवलीतील सत्ताधारी प्रशासन व पालिका अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. भाजप सरकार राज्यात सत्तेमध्ये असताना केडीएमसीला सर्वाधिक निधी मिळाला. मात्र जी कामे करणे आवश्यक होती ती शिवसेनेने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आणि आता तीच कामे नावं बदलून केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची विकासकामे करण्याची मानसिकता नाहीये. 10 वर्षांपासून पालकमंत्री, 7 वर्षे खासदार आणि पालिकेत सत्ता सेनेची आहे, मात्र काय विकास झाला.

हेही वाचा: "ठाण्याच्या" धर्तीवर "कल्याण"मधील प्रयोगही यशस्वी

कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाने आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. आमदार गायकवाड यांनी निधी आणला मग कामे होऊ द्यायची नाहीत. या कुरघोडीच्या राजकारणात 2 वर्षे कामे झालेली नाहीत. एकीकडे विकासकामांना खीळ घालायचा आणि दुसरीकडे आमदारांनी काय कामं केली असे विचारत लोकांची दिशाभूल करायची. मात्र आगामी केडीएमसी निवडणुकीत विरोधकांना आपण त्यांच्या सर्व हिशेब चुकते करणार असल्याचा इशारा आमदार गायकवाड यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: महापालिका निवडणूक : अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता

तर अपक्ष म्हणून जास्त मताधिक्य मिळाले असताना, भाजपा मध्ये गेल्यावर तेवढे मिळाले नाही, पक्षात खुश आहात का या प्रश्नावर आमदार म्हणाले, पक्षाचे विचार आणि काम करण्याची पद्धत यावर खुश आहे.

आगामी केडीएमसी निवडणुकीत शिवसनेपेक्षा भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

loading image
go to top