रायगडला वादळं परतवण्याची सवय म्हणत रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर

रायगडला वादळं परतवण्याची सवय म्हणत रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर

रायगड, अलिबाग - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि अनेक अधिकारी हे वादळानंतरचा पाहणी दौरा करतायत. अशात प्रशासन सज्ज राहिल्यामुळे मोठी जीवितहानी रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

आज पर्यावरण दिनाच्या दिवशी रायगडमध्ये यावं लागलं आणि इथली पडझड पाहायला मिळाली. दरम्यान मी रायगड मधील नागरिकांचं कौतुक करण्यास आणि नागरिकांना दिलासा देण्यास आलोय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. याचसोबत शिवरायांच्या रायगडला वादळं परतवणे नवीन नाही असंही उद्धव ठाकरे. 

रायगडसाठी १०० कोटीची तातडीची मदत :
  
सरकारकडून वादळानंतरचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. आदेश देण्याआधीच पंचनामे सुरु देखील झालेत. या पार्श्वभूमीवर येत्या ८ ते १० दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीचे आकडे पुढे येतील. मात्र रायगड जिल्हा पुन्हा उभा राहावा यासाठी सरकारकडून ताबडतोबीने १०० कोटी रुपये मंजूर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यातून रायगड जिल्हा लवकर पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होईल. नुकसानाची पाहणी केल्यानंतर, आकडेवारी समोर आल्यानंतर पुढील मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. याचसोबत जशी रायगडला मदत केलीये तशीच मदत इतर जिल्ह्यांना देखील केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

सर्व जिल्हे पुन्हा उभे करू 

निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालंय ते जिल्हे लवकरात लवकर पुन्हा उभे करू, पूर्ववत करू असं उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान या संकटातून आपण बाहेर आलो आहोत. मात्र पुढे कोरोनाचं मोठं संकट आपल्यासमोर उभं आहे हे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. 

त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. अनेक ठिकाणी झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झालीये. मोबाईल नेटवर्क गेलंय, अनेक ठिकाणी वीज नाहीये. शेती आणि बागांचं नुकसान झालंय. या वादळात काही जनावरं दगावली असतील. त्यामुळे साफसफाई आणि इतर सर्व कामं आता युद्धपातळीवर करायची आहेत. अशात काही टीम बाहेरून मागवायला लागतील. मात्र वादळाने नुकसान केलेले सर्व जिल्हे पुन्हा पूर्ववत करू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. 

रायगड ही शिवरायांची राजधानी आहे. इथल्या नागरिकांना वादळ परतवणे कठीण नाही. जेंव्हा काही लोकं वादळ आपल्या दिशेने येणार का याचा वेध घेत होते तेंव्हा रायगडमधील नागरिक या वादळाचा सामना करत होते. त्यामुळे इथल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि इथल्या नागरिकांचं कौतुक करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आजचा रायगड दौरा केला. 

cm uddhav thackeray declared Rs 100 crore as immediate compensation fund for raigad after nisarga

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com