esakal | तेजस्विनी धावणार; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

तेजस्विनी धावणार; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील (kalyan-dombivali) महिलांना सुखकर व सुरक्षित प्रवास देण्याचा दृष्टीने (women's safety journey) कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) परिवहन सेवेच्या ताफ्यात तेजस्विनीच्या चार बस (tejaswini bus) उशिरा का होईना दाखल झाल्या. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची वेळ मिळत नसल्याने बसचा लोकार्पण सोहळा लांबला होता. याविषयी दै. सकाळने (sakal news) 26 ऑगस्टला तेजस्वीनीची अजूनही प्रतीक्षा हे वृत्त प्रसारित केले होते. अखेर मंगळवारी दुपारी 1 चा मुहूर्त निघाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray), यांच्याहस्ते ऑनलाईन सोहळा होणार असून डोंबिवलीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (kapil patil), पालकमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: दहिसरमध्ये आगळेवेगळे एनर्जीपार्क; अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे उभारणी

महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात केवळ महिलांसाठी तेजस्विनी बस सुरु करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. 2018 साली चार बस देखील मंजूर झाल्या. मात्र बस खरेदीसाठी पाच ते सहा वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नव्हता. फेब्रुवारी 2021 मध्ये निविदेला प्रतिसाद मिळाला आणि तेजस्विनी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाली. तेजस्विनी बसेसवर बाह्ययंत्रणेमार्फत 15 महिला वाहकांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व प्रक्रिया पार पडूनही बसचे लोकार्पण न झाल्याने बस रस्त्यावर धावत नव्हत्या.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने बसचा लोकार्पण सोहळा लांबला होता. याविषयी दै. सकाळने तेजस्विनीची महिलांना अजूनही प्रतीक्षा या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. सकाळच्या बतमीची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील पालकमंत्री शिंदे यांना ट्विट करत लोकार्पण कधी होणार असा सवाल केला होता. याची दखल अखेर घेण्यात आली असून अखेर मंगळवारचा मुहूर्त निघाला आहे. मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास कल्याण डोंबिवलीतील विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणार आहे.

या मार्गावर धावणार बस

1) कल्याण रिगस्ट- कल्याण

2) कल्याण मोहना कॉलनी

3) झाबवली निवासी विभाग

4) झाबवली लोढा हेवन

बसेसची क्षमता

मिडी बसेसची क्षमता 27 सीटस अधिक एक चालक सीट अशी आहे.

बसची वेळ

महिलांसाठी सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 5 ते रात्री 9

loading image
go to top