ब्रेकिंग : सुशांत सिंह प्रकरण, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा, मुंबईत मोठ्या घडामोडी

सुमित बागुल
Wednesday, 19 August 2020

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी त्यांच्यासोबत देखील संपूर्ण प्रकरणाबाबत चर्चा करू शकतात

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता CBI कडे गेलाय. आज सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल दिला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून CBI कडे जाताच मुंबईत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतायत.

थोड्या वेळापूर्वी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर काही वेळापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर मुंबईत मोठ्या घडामोडी घडण्यास सुरवात झाली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बैठक झाली. तर मंत्रालयात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याबरोबर बैठाकू सुरु आहे.

मोठी बातमी - पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी त्यांच्यासोबत देखील संपूर्ण प्रकरणाबाबत चर्चा करू शकतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आता राज्य सरकार या निर्णयाविरोधात काही पावलं उचलतेय का ते पाहणं महत्त्वाचं आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI करणार असल्याने उद्याच CBI ची एक टीम मुंबईत दाखल होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. CBI चे तपास अधिकारी सुशांतच्या घरी जाऊन तपासणी करणार असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी CBI ची दिल्लीची टीम मुंबईतील CBI टीमच्या संपर्कात आहे. त्यामुळे CBI च्या मुंबईतील टीमने मुंबई पोलिसांशी संबंधित संवाद साधण्याची सूचना मुंबई CBI टीमला दिली गेल्याचंही समजतंय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI सर्वात आधी केस डायरी आणि शवविच्छेदनाचा अहवाल मुंबई पोलिसांकडून घेणार असल्याचं समजतंय

cm uddhav thackeray met mumbai police cp parambir singh after supreme courts order about ssr cbi investigation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray met mumbai police cp parambir singh after supreme courts order about ssr cbi investigation