esakal | पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....
sakal

बोलून बातमी शोधा

पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

पार्थ यांनी काय ट्विट केलंय याबाबत मला अजिबात माहित नाही. शेवटी कोर्टात गेलेला तो विषय होता. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला आहे

पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिलाय. या निकालानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. मात्र या सर्वात लक्षवेधी प्रतिक्रिया ठरतेय ती अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांनी 'सत्येमेव जयते' अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीये. खरंतर पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI तपासणी व्हावी अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या नेत्याकडे असणाऱ्या गृह विभागाला म्हणजेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसं रीतसर पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. 

या मागणीनंतर पार्थ यांनी केलेल्या सुशांत प्रकरणातील CBI चौकशीच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही असं विधान खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं. शरद पवारांचं पार्थ यांच्याबाबतचं वक्तव्य आणि सुशांत प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने दिलेला तपासणीबाबतचा निकाल यानंतर पार्थ पवार यांची ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. 

मोठी बातमी - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत घडामोडींचा वेग, गृहविभागात घडतायत 'या' घटना

"मला काही बोलायचं नाही" - रोहित पवार 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची तपासणी मुंबई पोलिसांकडून आता CBI कडे गेलीये. यावर पार्थ यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केल्यानंतर याबाबत रोहित पवार यांना पार्थ यांच्या ट्विटबाबत विचारणा केली गेली. यावर बोलताना, पार्थ यांनी काय ट्विट केलंय याबाबत मला अजिबात माहित नाही. शेवटी कोर्टात गेलेला तो विषय होता. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला आहे. कुठल्या बेंचकडे कसं जायचं, पुढे काय निर्णय घ्यायचा, हा सरकारचा विषय आहे. दरम्यान पार्थ यांनी 'त्या' ट्विटमध्ये काय लिहिलंय, कसं लिहिलंय हे या ठिकाणी लगेच सांगता येणार नाही. कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा अर्थ काढता येतो, हे आपल्या आपल्या विचारांवर असतं. याचा अर्थ तुम्ही काय काढता हे मला सांगता येणार नाही, असं रोहित पवार म्हणालेत. पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे हे ही माझं मत आहे, असंही राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणालेत. 

rohit pawars reaction on parth pawars satyamev jayate tweet after supreme court handovers SSR investigation to CBI