'त्यांना' परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या, नाव न घेता महाराष्ट्र भाजपाची उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली तक्रार

'त्यांना' परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या, नाव न घेता महाराष्ट्र भाजपाची उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली तक्रार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाव न घेता तक्रार केलेली आहे. आज नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून चर्चा केली. कोरोनाच्या मुद्द्यावर ही महत्त्वाची चर्चा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भाजपची थेट मोदींकडे नाव न घेता तक्रार केलीये. एकीकडे कोरोनाचा संवेदनशील काळ आहे, अशात महाराष्ट्रात जीवाशी खेळण्याचं राजकारण केलं जातंय. या काळात राजकीय पक्षांना राजकारण न करण्याच्या सूचना द्या अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे  : 

"महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार कोरोना रुग्ण सापडत होते. आज महाराष्ट्रात ४ हजार ७०० ते ५ हजार रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रतील रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरीही आम्ही राज्यातील नागरिकांना गाफील न राजण्याच्या आणि त्रिसूत्रीचा पालनाच्या सूचना दिलेल्या आहेत. पंतप्रधानांनी किंवा देशाच्या गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे. अशा काळात राजकारण न करता उपाय योजनांमध्ये सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य समज द्यावी. एकीकडे राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालण्याचं आवाहन करत आहोत. तर, दुरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत. त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात. यामुळे कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकतं."

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी काम करत आहे. अशात काही राजकीय पक्ष आरोग्य विषयक नियम मोडून रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावे, लसीचे वितरण कसे करावेत, यासंदर्भात टास्कफोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते .

CM uddhav thackeray says PM should take meeting of all political parties to let them know about covid situation 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com