esakal | "माझी मातृभाषा अमृताहूनही गोड": उद्धव ठाकरे 
sakal

बोलून बातमी शोधा

"माझी मातृभाषा अमृताहूनही गोड": उद्धव ठाकरे 

"माझी मातृभाषा अमृताहूनही गोड": उद्धव ठाकरे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. मराठी भाषेला योग्य तो सन्मान मिळावा यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची पर्वा न करता अविरत झटले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत भाषण केलं आहे. "माझी मराठी अमृताहूनही गोड आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.  
  
मराठी भाषा गौरव दिनाचं महत्व:
 
दरवर्षी २७ फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनानं हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून जाहीर केला.

हेही वाचा: निवडणुकीतील पराभवानंतर 'ते' गेले अज्ञातवासात 

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे: 

"मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा अमृताहूनही गोड आहे. महाराष्ट्राचे संत यांनी मराठीला वेगळं आणि महत्वाचं स्थान मिळवून दिलं आहे. मराठीला सन्मान मिळवून देण्यासाठी कित्येक जण झटले आहेत. मराठी भाषा टिकवण्याची जवाबदारी आपल्या पिढीची आहेच मात्र येणाऱ्या पिढीलासुद्धा मराठीचा सन्मान करायला शिकवणं हेही आपलं कर्तव्य आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे मात्र मी कोणावरही माझी भाषा लादणार नाही. कर्नाटकात जशी भाषा लादली जाते तसं महाराष्ट्रात होणार नाही. मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवली जावी याबद्दल मी आग्रही आहे." असं उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत बोलतांना म्हंटलं आहे.  

CM Uddhav Thackeray praises Marathi Language   

 
 

loading image