esakal | निवडणुकीतील पराभवानंतर ‘ते’ अज्ञातवासात?
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश लाड

लाड यांचा कर्जत मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांनी या मतदारसंघातील ग्रामपंचायतींपासून ते विधानसभेपर्यंतच्या अनेक निवडणुकांत एकहाती विजय मिळवला होता; परंतु त्यांना गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली.

निवडणुकीतील पराभवानंतर ‘ते’ अज्ञातवासात?

sakal_logo
By
अनिल पाटील

खोपोली : विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात झालेला दारुण पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. त्यानंतर लाड हे बहुतांश सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या या ‘अज्ञातवासा’ची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जत पालिका निवडणुकीत त्यांची कन्या प्रतीक्षा यांचाही पराभव झाला होता. 

लाड यांचा कर्जत मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांनी या मतदारसंघातील ग्रामपंचायतींपासून ते विधानसभेपर्यंतच्या अनेक निवडणुकांत एकहाती विजय मिळवला होता; परंतु त्यांना गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती  तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रम ते उपस्थित होते. 
खालापूर, खोपोली आणि कर्जत भागात आतापर्यंत पक्षांचे अनेक लहान- मोठे कार्यक्रमात झाले. त्यामध्ये ते उपस्थित नव्हते, असे कार्यकर्ते सांगतात.

या अगोदर मतदारसंघातील हरिनाम सप्ताहापासून लग्न समारंभात ते उपस्थित राहत होते. कार्यकर्त्यांच्याच नव्हे, तर विरोधकांच्याही  सुखदुःखाद सहभागी होणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. आता ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर का राहत आहेत, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडत आहे. 

धक्कादायक :  आंतरजातीय विवाहाचा मार्ग खडतड

या संदर्भात लाड यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, सुरेश लाड हे निराश नाहीत. आरोग्याच्या तक्रारी वाढल्याने ते उपचार घेऊन विश्रांती घेत आहेत. दरम्यान, याबाबत लाड यांच्याशी संपर्क झाला नाही. 
लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला संजीवनी देण्यासाठी तटकरेंच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे.

हे वाचा : प्रकल्पग्रस्त आक्रमक


तटरकरेंना साकडे
माजी आमदार सुरेश लाड सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहत नाहीत. या संदर्भात काही वरिष्ठ पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लाड यांनी पुन्हा सक्रिय व्हावे, यासाठी विनंती केल्याचे समजते.

loading image
go to top