फडणवीसांच्या उत्तर सभेवर मुख्यमंत्र्यांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांची आज गोरेगावमध्ये उत्तर सभा पार पडली यामध्ये त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
devendra fadnavis-uddhav Thackeray
devendra fadnavis-uddhav Thackeraysakal media

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत आज उत्तर सभा पार पडली. या सभेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. यातून त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केलं आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनपट असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. (CM Uddhav Thackeray response on Devendra Fadnavis in one sentence only)

devendra fadnavis-uddhav Thackeray
"बाळासाहेब वाघ होतेच पण आता एकच वाघ, नरेंद्र मोदी"

दिवंगत शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाचा विशेष शो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाविषयी भाष्य केलं. शेवटी पत्रकारांनी त्यांना आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तर सभेबद्दल विचारलं असता त्यांनी सुरुवातीला भाष्य करणं टाळलं पण जाता जाता त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या गुरु-शिष्याच्या नात्याचा संदर्भ देताना शिवसेना-भाजपच्या युतीचा उल्लेख न करता फडणवीसांचा टोला लगावला. "त्यांना गुरु शिष्याचं नातं सांगण्यात काही अर्थ नाही", असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अशा प्रकारे केवळ एका वाक्यातच त्यांनी फडणवीसांच्या उत्तर सभेवर भाष्य केलं.

दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे - मुख्यमंत्री

दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी पुन्हा जीवंत केले आहेत. त्यांनी अप्रतिम भूमिका केली आहे. विशेषतः आनंद दिघे यांच्या बारीकसारीक लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या मला कल्पना नाही पण असं कुठेही जाणवलं नाही. सर्वांनी हा चित्रपट आवश्य पहावं हे केवळ मी चित्रपट चालावा यासाठी नाही तर आयुष्य कसं जगावं यासाठी हा चित्रपट पहावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असावेत हे या चित्रपटातील एक वाक्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या शहरात आनंद दिघे असतील असं केवळ शहरातील लोकांनाच नाही तर गुंडानाही वाटेल त्यावेळी आपल्याला तो आनंद दिघे नावाचा धाक, दरारा जाणवेल. सहाजिकच एक शिवसैनिक कसा असावा? निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिला. शिवेसना आणि आनंद दिघे यांचं नात अधिक घट्ट होतं, असे शिवसैनिक मला लाभले हे माझं भाग्य आहे. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यांच्यावर निस्सिम प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत. पुढे जाताना नेमकं गुरु-शिष्याचं नातं कस असावं हेच आपल्याला पुढे नेणारं आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com