
वर्षा, सेना भवनबाहेर शिवसैनिकांचे शक्ती प्रदर्शन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांसोबत तसेच राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री पदासाठीचा मोह नाही सांगत वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडण्याची घोषणा त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. भावनिक संवाद साधताना त्यांनी मातोश्रीवर जाण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळेच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या भावनिक संवादाला प्रतिसाद देत वर्षा बंगला तसेच शिवसेना भवन येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ याठिकाणी घोषणाबाजी केली.
तसेच उद्ध्वस्त ठाकरे जी भूमिका घेतील त्यासाठी आम्ही तयार आहोत असाही पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पाठिंबा दाखवणारे फलकही याठिकाणी आणले होते. वर्षा बंगल्या बाहेर रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमली होती. वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर उद्ध्वस्त ठाकरे जाणार म्हणून शिवसैनिक भावूक झालेलेही याठिकाणी दिसले. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यातील सामान, वस्तुने भरलेल्या वाहनांचा ताफाही मातोश्रीकडे निघालेला याठिकाणी पहायला मिळाला.
Web Title: Cm Uddhav Thackeray Shiv Sena Leave Government Residence Varsha Bungalow Facebook Live Announcement Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..