हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं' असं म्हणत राज्यपालांना सणसणीत टोला लगावला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. मात्र राज्यात मंदिरं खुली करण्यावरुन राज्यात मोठं राजकारण पेटलं होतं. भाजपकडून मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं झाली. यावेळी राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन डिवचलं होतं. त्यानंतर राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा बराच वादही पेटला होता.

आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व सोयीचं नाही. आमचं हिंदुत्व आमच्या अंगामध्ये, धमन्यांमध्ये भिनलेलं आहे. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल आणि भाजपला काढला. 

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपाकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. त्यावर राज्यपालांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून उत्तर दिलं. 

महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

CM Uddhav Thackeray slammed Governor Bhagat Singh Koshyari issue Hindutva

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com