'आयुष्यात खोटं बोललो नाही, बोलणार नाही'; विधिमंडळात मुख्यमंत्री गरजले!

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 March 2021

विधानसभेत आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टोलेबाजी केली.

मु्ंबई : कोरोना काळात एकही रुग्ण लपवलेला नाही, असं सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, विधिमंडळात विरोधकांवर शरसंधान साधलं. कोविड काळात राज्य सरकारनं खूप काम केलं. कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमधील बेड घेतले होते. पाच लाखांवर रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळवून दिला, अशी माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कामांचा पाढा वाचला. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकसे एक टोले लगावले. कोरोनाकाळात राज्याला आर्थिक मदत हवी होती. त्यावेळी अनेकांनी गोळा केलेला निधी दिल्ली गेला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत मिळाली नाही. ज्यांनी दिली त्यांचे आभार पण, बाकीच्यांनी याचा विचार करावा, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

 • औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर नक्की करू
 • खोटेपणा आमच्या रक्तात नाही, कधीही खोटे बोललो नाही, बोलणार नाही
 • योजनांचा धूर निघतोय आणि गॅस बंद झालाय
 • मला राज्याच्या जनतेची काळजी, मला वाईट म्हटलं तरी मी काळजी घेणार
 • राज्यातील जनतेची सुरक्षा हे आमच्या सरकारचं पहिलं कर्तव्य
 • मास्क घालणं, सतत हात धुणं आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री पाळायलाच हवी
 • कोरोनाला सत्ताधारी आणि विरोधक पाहत नाही
 • शेतकऱ्याला हमखास भाव मिळाला पाहिजे, ही आमच्या सरकारची भूमिका

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्धव ठाकरेंचे भाजपला टोले

 • पाठ थोपटून घेण्यासाठी काम करणारी छाती लागते  
 • सरदार पटेलांच्या स्टेडियमचं नाव का बदललं?
 • सावरकरांना भारतरत्न का देत नाही?
 • पीएम केअर फंडाविषयी कोणाची बोलायची हिंमत नाही
 • शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे
 • शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर असं ताटकळत ठेवत असाल तर, भारतमाता की जय म्हणण्याचा अधिकार नाही
 • सायकली हवा भरण्याचेही दर वाढू शकाल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray speech vidhan sabha