
ठाकरे सरकार vs शिवसेना.. पालघरमध्ये लसींच्या मुद्द्यावर खडाजंगी
पालघर: जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी प्रमाणात लसपुरवठा (Vaccine Supply) होत असल्याने या ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी आहे. त्यातच पालघर (Palghar) नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात आठ लसीकरण केंद्र (Vaccination Centers) सुरू करून या केंद्रांसाठी पालिकेने आठ लाख रुपये खर्च केले आहेत. असे असूनही या ठिकाणी लस (No Vaccine) दिली जात नसल्याने नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, गटनेते व शिवसेनेच्या नगरसेवकांनीच आक्रमक होत लस मागणीसाठी शिवसेनाशासित राज्य सरकारविरोधात (Shivsena vs Uddhav Thackeray) जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालयाला घेराव घातला. 'लस द्या, नाही तर लसीकरण केंद्र बंद करा', अशा घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
हेही वाचा: कुर्ला: Video चॅटवर गर्लफ्रेंड लग्नाला नाही बोलली, तरूणाने उचललं टोकाचं पाऊल
पालघर जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या वसई विरार महानगर पालिकेनंतर पालघर नगरपरिषद मोठी आहे. या नगरपरिषद क्षेत्रात 11 टक्के लसीकरण झाले आहे. अजूनही हजारो नागरिकांना पहिला डोस मिळालेला नाही. त्यांना लसी मिळाव्यात, यासाठी नगरपरिषदेत किमान दोन केंद्रांना लसी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पालघर नगरपरिषद क्षेत्रात एकच लसीकरण केंद्र सुरू आहे. येथे अनेक नागरिकांना लस मिळत नसल्यामुळे रात्रभर त्यांना रांगेत उभे राहून लसीकरण करून घ्यावे लागत आहे. लस मिळत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी एकत्रित येत आज लसींची मागणी केली आहे. पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू करूनही प्रतिबंधक लस दिलीच जात नाही, असे आरोप या नगरसेवकांनी यावेळी केले.
हेही वाचा: ...तर गुन्हा दाखल करु, लोकशाही मार्गाचे प्रवाशांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
नगराध्यक्षा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांना घेराव घालून आम्हाला लसीचा पुरवठा का केला जात नाही? याबद्दल जाब विचारला. त्यावर, 'लसीचे वाटप जिल्ह्यातील आठ तालुक्यांना करावे लागत आहे. लस कमी मिळत असल्यामुळे पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्र बंद आहेत', असे डॉक्टर सूर्यवंशी यांनी निदर्शनास आणून दिले.
पालघर शहरात लस गोंधळ कायम असून काही डॉक्टर्स स्वतःकडे लसी राखीव ठेवत आहेत व वशिलेबाजी करणाऱ्याला ती लस लपून छपून चोरीच्या मार्गाने दिली जात आहे. मग सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे? असा सवाल शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासमोर उपस्थित केला व नगरपरिषद क्षेत्रातील केंद्र पुन्हा सुरू करून लस पुरवठा करण्याची मागणी केली.
यापूर्वी वसई विरारकरांना लस उपलब्ध व्हावी, यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. नागरिकांना लस मिळावी यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी अनेक संघटनांनी केल्याने शासनापुढे वेगळा प्रश्न उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: 'अदानी एअरपोर्ट्स'चे मुंबई विमानतळावरील बोर्ड्स नियमानुसारच!
शासनाकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याने येणाऱ्या लसीचे चे वाटप करावे लागत आहे पालघर जिल्ह्यात आठ तालुके आहेत प्रत्येक तालुक्याला नियोजन करून वाटप करावे लागत आहे पालघर नगरपालिका क्षेत्रात सध्या एकाच केंद्रात लसीकरण सुरू आहे पालिकेने अधिक लस मिळावी म्हणून शासनाकडे प्रयत्न करावेत सध्या 25% लस खाजगी रुग्णालयात दिली जाते त्यामुळे लस्सी चा पुरवठा कमी होत आहे.
- दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी
पालघर नगरपालिका क्षेत्रात पालिकेने एकूण आठ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत मात्र लस उपलब्ध नसल्याने सर्व केंद्र बंद आहेत त्यामुळे पालिका क्षेत्रातील लोकांचा रोष आम्हाला पत्करावा लागत आहे वसई महानगर पालिकेला ज्या प्रमाणात लक्ष पुरवठा केला जातो त्याच प्रमाणात आम्हाला लक्ष पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे लस मिळावी म्हणून आज आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली.
- डॉ. उज्वला काळे, नगराध्यक्षा, पालघर नगर परिषद
(संपादन- विराज भागवत)
Web Title: Cm Uddhav Thackeray Vs Shivsena Party Workers As Vaccination Shortage Issue Erupted Big Fight Vjb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..