esakal | बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती

वस्तूही खराब होणार; शॉपिंग सेंटर्स असोसिएशनची भीती. निर्बंधासह परवानगी देण्याची शॉपिंग सेंटर्स असोसिएशनची मागणी

बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : राज्यातील शॉपिंग मॉल तत्काळ उघडले नाहीत तर, 50 लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावेल, अशी भीती शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे. दुकाने बंद असल्याने त्यातील वस्तू खराब होत असून आता मॉल बंद राहणे या या क्षेत्रासाठी मृत्युघंटा ठरेल, अशी गंभीर चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे. असोसिएशनने यासंदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मॉल सुरु करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.

राज्यातल्या मॉलपैकी निम्मे मॉल मुंबई, ठाणे, कल्याण, नवी डोंबिवली परिसरात तर, 20 टक्के मॉल पुणे परिसरात आहेत. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर येथे उर्वरित मॉल आहेत. सध्या तीसहून अधिक मॉलचे बांधकाम अर्धवट असून तेदेखील बंद पडले आहेत. सध्याची परिस्थिती अशीच राहिल्यास ऑगस्टमध्ये त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असे असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांनी म्हटले आहे.  

'इथे दारू का पिता'? विचारल्यावर त्याने चिडून डोक्यावर फोडली बाटली, मग घडलं असं की...

लॉकडाऊनमुळे महसूल बंद झाला असल्याने व्यावसायिकांची शिल्लकही संपत आली आहे. दैनंदिन खर्च भागवणेही व्यावसायिकांना कठीण होत आहे. दुकानदारांकडील लाखो रुपयांचे साहित्य माॅलमध्ये तसेच पडून राहिल्याने व देखभाल नसल्याने खराब होत आहे. त्यामुळे लवकरच त्याची किंमत शून्य होईल. आतापर्यंत या क्षेत्राला एक लाख कोटींचे नुकसान झाल्याचे, शाॅपिंग सेंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमिताश तनेजा यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातही परवानगी द्यावी!
सध्या देशभरात पाचशे शॉपिंग मॉल सुरु झाले असून तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठी व्यवस्थित नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही नियंत्रित स्वरुपात काम सुरु करण्याची संधी द्यावी, असे विवियाना मॉल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अग्रवाल म्हणाले. देशभरात सुरु झालेल्या मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर निर्बंध आहेत. पूर्वी मॉल म्हणजे फिरण्याची जागा अशी परिस्थिती होती, मात्र आता तशी अवस्था नसल्याचे फिनिक्स मॉलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोठी बातमी स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, राज्य परिवहन महामंडळातील २८ हजार कर्मचारी होणार कमी ?

निर्बंध पाळत माॅल उघडता येतील

योग्य अंतर राखून ग्राहकांना प्रवेश देणे, त्यांचे तापमान पाहणे, मॉलमध्ये प्रवेश करताना आरोग्य सेतू अपचा अनिवार्य वापर, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, फूड कोर्टमध्ये बसणाऱ्यांची संख्या निम्मी कमी करणे, पार्किंगची जागा कमी करणे, ऑनलाईन पेमेंट, उपचारांसाठी आवश्यक बाबी तयार ठेवणे, आदी नियम व निर्बंध करून मॉल उघडण्यास परवानगी देता येईल, असे शॉपिंग सेंटर्स असोसिएशनने आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

5 million people will lose their jobs if malls are not opened by government

loading image