esakal | मुख्यमंत्र्यांची हजेरी असलेल्या कार्यक्रमाला राज्यपालांची गैरहजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांची हजेरी असलेल्या कार्यक्रमाला राज्यपालांची गैरहजेरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणं टाळलं आहे. मुख्यमंत्री हजर असलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले. निमित्त होतं पोलिस स्मृती दिन २०२० या कार्यक्रमाचं 

मुख्यमंत्र्यांची हजेरी असलेल्या कार्यक्रमाला राज्यपालांची गैरहजेरी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः काही दिवसांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रव्यवहारानंतर वाद चांगलाच पेटला आणि अजूनही तो धुमसताना दिसतोय. या वादामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणं टाळलं आहे. मुख्यमंत्री हजर असलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले. निमित्त होतं पोलिस स्मृती दिन २०२० या कार्यक्रमाचं 

आज सकाळी ७ वाजता मुंबईतील हुतात्मा मैदान, नायगाव पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृती दिन मानवंदना कवायतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांना आमंत्रण होते. 

राजशिष्टचारानुसार, राज्यपालांना या कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचं होतं. मात्र या कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले. हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा या कार्यक्रमाला आले नाही.

अधिक वाचाः  आज ११ वाजल्यापासून सर्वसामान्य महिला करणार लोकलने प्रवास

महाराष्ट्र राज्यात मंदिरं उघडण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. 
बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला होता. तसंच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना  हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली.

अधिक वाचाः  सुशांतसिंह राजपूत प्रकरण: दीपेश सावंतकडून NCBवर १० लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरु करण्याबद्दल सूचना केली होती. ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली, अशी आठवण देखील मुख्यमंत्र्यांना करुन द्यायला राज्यपाल विसरले नाहीत.  तुम्ही 11 ऑक्टोबर कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपाल यांनी सांगितले.

cm uddhav thackery attend police commemoration day parade bhagat singh koshyari avoid programme