
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरामध्ये काम करणाऱ्या दिपेश सावंतने आता मुंबई उच्च न्यायालयात केन्द्र सरकार विरोधात दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. एनसीबीने मला गैरप्रकारे डांबून ठेवले असा आरोप त्याने केला आहे.
मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरामध्ये काम करणाऱ्या दिपेश सावंतने आता मुंबई उच्च न्यायालयात केन्द्र सरकार विरोधात दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. एनसीबीने मला गैरप्रकारे डांबून ठेवले असा आरोप त्याने केला आहे.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ संबंधित आरोपामध्ये सावंतविरोधात एनसीबीने गुन्हा नोंदविला आहे. सध्या तो जामीनावर आहे. एनसीबीने त्याला ५ सप्टेंबरला रात्री ८ वाजता अटक दाखविली आहे. मात्र प्रत्यक्षात त्याला ४ सप्टेबरला रात्री १० वाजता ताब्यात घेतले होते असा दावा त्याने केला आहे. त्याला ६ सप्टेंबरला रिमांडसाठी दंडाधिकारी न्यायालयात रात्री उशिरा हजर केले होते. त्यामुळे जवळपास ३६ तास विलंब करून त्याला न्यायालयात हजर केले, त्यामुळे भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याची मागणी त्याने केली आहे.
याचिकेवर 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्याच्या कडून अमलीपदार्थही मिळाले नव्हते आणि तो कोणाच्या संपर्कात ही नव्हता असा दावा याचिकेत केला आहे.
अधिक वाचाः कल्याणकरांच्या जलवाहतुकीवर फेरले 'पाणी', खर्चात कपात करण्यासाठी प्रकल्पातून वगळले
दीपेश हा सुशांतसिंहचा कर्मचारी होता. दीपेशबरोबरच सुशांतचा आणखी एक कर्मचारी सॅम्युएल मिरांडा आणि गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हे जवळपास एक महिना तुरुंगात होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरला त्यांचे जामीन अर्ज मंजूर करून त्यांना सशर्त जामीन दिला.
अधिक वाचाः पनवेलमध्ये कर कळीचा मुद्दा; प्रशासन- सदस्यात जुंपणार?
दीपेशने न्यायालयाच्या या निर्णयाआधीच ५ ऑक्टोबरला अॅड. आमिर कोराडिया यांच्यामार्फत एनसीबीविरोधात याचिका केली होती. या याचिकेवर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.
-----------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Sushant Singh Rajput case Deepesh Sawant claims Rs 10 lakh compensation NCB