कोस्टल रोडवर तोडगा काढणार : अस्लम शेख | Aslam Shaikh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aslam Shaikh

कोस्टल रोडवर तोडगा काढणार : अस्लम शेख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्या मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या (coastal road) खांबांमुळे वरळी कोळीवाड्यातील (worli) स्थानिक मच्छीमार बांधवांमधून (local fisherman) नाराजी व्यक्त होत आहे. कोस्टल रोड प्राधिकरण मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करून येथील स्थानिक मच्छीमारांनी ३० ऑक्टोबरला या रस्त्याचे काम बंद पाडून आंदोलन (strike) केले होते. याबाबत आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा: मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये लार्सन अँड टुब्रो आघाडीवर

कोस्टल रोडचे काम सध्या सुरू आहे. वरळीतील कोळी बांधवांचे त्यावर काय म्हणणे आहे ते ऐकून घेतले आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी या विषयावर बोलणार आहे. लवकरच त्यावर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले, की कोळी बांधवांना आंदोलनातून माघार घेण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेलाही सूचना करून जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पुढचे काम करू नका. या कोस्टल रोडला कोळी बांधवांचा विरोध नाही, त्यांच्या काही ठराविक मागण्या आहेत, त्या योग्य आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढू, असेही पालकमंत्री शेख म्हणाले.

loading image
go to top