Dombivli: तिकीट काउंटरवर नागाचा डेरा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर गोंधळ, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण; Video Viral

Cobra Snake Found At Dombivli Station: डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीत नाग फणा काढून बसल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.
Cobra Snake Found At Dombivli Station

Cobra Snake Found At Dombivli Station

ESakal

Updated on

कल्याण : मध्य रेल्वेवरील डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीत शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला. खिडकीवर भला मोठा नाग फणा काढून बसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. यावेळी तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली असून काही काळ तिकीट वितरणावर परिणाम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com