कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोका-कोला चा सहभाग; कोरोना योद्ध्यांसाठी करणार 'हे' काम..  

coca cola
coca cola

मुंबई : कोरोना योध्यांना साह्य करण्यासाठी कोका-कोलाने देशातील आठ राज्‍यांमधील ४८ सार्वजनिक रूग्‍णालयांमध्‍ये आरोग्यविषयक उपक्रमांना चालना देण्‍यासाठी युनायटेड वे मुंबईसोबत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक रूग्‍णालये तसेच आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच सफाई कामगार, पोलिस कर्मचारी अशा ६५ हजारांहून अधिक कोरोना योद्ध्यांना ही मदत केली जाईल. यासाठी कोकाकोलाने १०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.

मुंबईत हा उपक्रम सर्वप्रथम सुरु झाला असून १३ रुग्णालयांमधील अडीच हजार कर्मचारी तसेच वीस हजार सफाई कामगार, सहा हजार पोलिस व बाराशे अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. जास्त संसर्ग असलेल्या आठ राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही मोहीम राबविली जाईल. 

यामध्‍ये महाराष्‍ट्र (मुंबई, पुणे), दिल्‍ली, तामिळनाडू (चेन्‍नई), कर्नाटक (बेंगळुरू), तेलंगणा (हैद्राबाद), गुजरात, पंजाब व हरियाणा या राज्‍यांचा समावेश आहे. या कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेसाठी पीपीई किट दिले जाईल, त्यात एन ९५ मास्‍क्‍स, तीन पदरी मास्‍क्स, सर्जिकल कॅप्‍स, सर्जिकल गॉगल्‍स, पीपीई किट, शू कव्‍हर्स, ग्‍लोव्‍ह्ज यांचा समावेश आहे. 

तर वैद्यकीय तयारीसाठी सॅनिटायझर डिस्‍पेन्‍सर्स, अतिरिक्‍त आयसीयू बेड्स आणि नॉन-कॉन्‍टॅक्‍ट थर्मोमीटर आदी बाबीही दिल्या जातील. देशभरात पन्नास हजार सफाई कामगार, अकरा हजार पोलिस व सहा हजार आरोग्य कर्मचारी यांना ही मदत मिळेल व तिचा अंतिमतः याचा फायदा नऊ लाख रुग्णांना होईल, अशी अपेक्षा आहे, असे कोकाकोला इंडिया चे उपाध्यक्ष इश्तेयाक अमजद म्हणाले.

संपादन : अथर्व महांकाळ 

coca cola company will provide essentials to health workers and police 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com