इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर मैत्रिणीच्या घरीच 13 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला नुकतीच कुलाबा पोलिसांनी अटक केली.

इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

मुंबई:  इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर मैत्रिणीच्या घरीच 13 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला नुकतीच कुलाबा पोलिसांनी अटक केली. मित्राला भेटायला गेली असताना तक्रारदाराची मुलगी आरोपी तरूणाकडे घराची चावी विसरली होती. त्याच्या सहाय्याने ही चोरी करण्यात आली. आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कुलाब्यातील एका चार्टर्ड अकाउंटंट कुटुंबियांसोबत परराज्यात गेला होता. परत आल्यानंतर त्याच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी 27 जानेवारीला तक्रार केली असता पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पण घरात कोणतीही तोडफोड न करता चोरी झाल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय बळावला. यावेळी कुटुंबियांनी त्यांची मुलीला विश्वासात घेतले असता तिने आपल्या जवळच्या मित्राकडे चावी विसरली असल्याचे सांगितले. त्या चावीचा वापर करून तिच्या 19 वर्षीय मित्रानेच घरात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार या मुलाला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून दोन लाखांची रोख आणि महागडा आयफोन मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्याला याप्रकरणी अटक केली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

19 वर्षीय आरोपीही उच्चभ्रू कुटुंबातील असून माझगाव येथ राहतो. आरोपी आणि तक्रारदार याची मुलगी यांची इन्स्टाग्रावर मैत्री झाली होती. त्यातून दोघेही एकमेकांना भेटत होते. मुलीकडील चावी आरोपीकडे आल्यानंतर त्याला मैत्रीणीच्या घरातील व्यक्ती बाहेरगावी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याने हा चोरीचा कट रचला. दोघेही मुले चांगल्या घरातील आहे. पण उच्चभ्रू जीवन जगण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. तरी पोलिस आरोपीकडे याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचा-  मुंबईत कोरोना व्हायरसची स्थिती दिलासादायक, शहरात रुग्णवाढीचा दर 0.12 वर

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Colaba police arrested boy stealing 13 lakh from his friend house after friendship Instagram