
मुंबई : मुंबईकरांसाठी एक नवे पर्यटन आकर्षण आणि पादचाऱ्यांसाठी सुटसुटीत व सुरक्षित प्रवासाचे साधन ठरणारा ‘वॉकिंग प्लाझा’ प्रकल्प कुलाबा परिसरात आकार घेत आहे. दीपक जोग चौक (मंत्रालय) ते भाई भांडारकर चौक (बधवार पार्क) या सुमारे २१० मीटर लांबीच्या मार्गावर साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत याचे काम पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे.