महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह; दोन हजार टन साठवण क्षमता

Railway Cold Storage : कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्याचा पुढाकार घेतला असून रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार आहे.
Konkan Railway

Konkan Railway

esakal

Updated on: 

नितीन बिनेकर

मुंबई : हापूस आंबा, मासळी, द्राक्षे आणि डाळिंबासारख्या नाशवंत उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्याचा पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार असून, त्यासाठी कोकण रेल्वे आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पासाठी जागा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार असून, उभारणीसाठीची गुंतवणूक महामंडळ करणार आहे. महसूल वाटपाच्या तत्त्वावर उभारण्यात येणारे हे शीतगृह दीड वर्षात सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com