esakal | दिवाळीत गायब झालेली कडकडीत थंडी कधी परतणार ? आता मिळालं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत गायब झालेली कडकडीत थंडी कधी परतणार ? आता मिळालं उत्तर

मुंबईत सध्या जाणवणारा उकाडा आणखी काही दिवस कायम राहणार असून राज्यातील इतर भागात मात्र तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दिवाळीत गायब झालेली कडकडीत थंडी कधी परतणार ? आता मिळालं उत्तर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत सध्या जाणवणारा उकाडा आणखी काही दिवस कायम राहणार असून राज्यातील इतर भागात मात्र तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे  उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तापमानात घट होणार असल्याने तेथे थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यभरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बर्‍यापैकी गारठा पडला होता. परंतु दिवाळीत थंडी गायब झाली होती. मुंबईच्या तापमानात ही वाढ होत कमाल तापमान 35 अंश याच्या आसपास नोंदविण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. दिवाळीनंतर मुंबईतल्या तापमानात वाढ होत असली तरी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात येत्या 48 तासात तापमानात घट होईल. कमाल तापमान 30 अंशा खाली तर किमान तापमान 14 ते 18 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. परिणामी थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार आहे.

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; 24 तारखेला होणार सुनावणी 

नोव्हेंबरमध्ये मुंबईचे किमान तापमान 19 अंशावर दाखल झालं होतं, तसंच राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीने चांगला जोर पकडला होता. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेला गारठा दुसऱ्या आठवड्यातही काही दिवस कायम होता, मात्र दिवाळीनंतर मुंबईमधली थंडी गायब झाली. कमाल तापमान वाढू लागल्याने वाढत्या तापमानाचे मुंबईकरांना चटके बसू लागले. 

मुंबईतही वाढत्या तापमानाचा फटका बसत असून उकाड्यात किंचित वाढ झाली असली तरी मुंबईचे तापमान डिसेंबरपर्यंत पंधरा वर्षाच्या खाली घसरणार आहे. असं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 20 डिसेंबर पासून थंडी आणखी वाढणार असून तापमान पाच अंशा पेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबई बरोबरच पुण्याचा पारा 7.8 खाली तर नागपूरचा पारा 5 अशा खाली तर नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा,  उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी अशा क्रमाने तापमान घसरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

( संपादन - सुमित बागुल )

cold wave to hit maharashtra in coming few days but mumbaikar will have to wait for winter 

loading image
go to top