esakal | तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

मुंबईतील तब्बल 29 मॉल्स मधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा अपुरी असल्याची स्फोटक माहीती उघड

तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.19 : मुंबईतील तब्बल 29 मॉल्स मधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा अपुरी असल्याची स्फोटक माहीती उघड झाली आहे. अग्निशमनदलाने या मॉल्सना नोटीस पाठवून महिन्याभरात त्रुटी दुर करण्याचे आदेश दिले आहेत. यातील 22 मॉल्स हे पश्‍चिम उपनगरातील आहेत. या त्रुटी दुर न केल्यास मॉल्सचा परवानगा रद्द करण्यासह न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ऑक्टोबरमहिन्यात नागपाडा येथील सिटी सेंटर माॅलला लागलेली आग 56 तासानंतर विझली होती. यामुळे मुंबईतील माॅल्समधील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मुंबई अग्निशमन दलाने मागील दहा दिवसांपासून शहरातील 71 मॉल्सची तपासणी केली आहे. त्यापैकी सिटी सेंटरसह 29 मॉल्स मधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत. या सर्व मॉल्सना नोटीस पाठविण्यात आल्या असून महिन्याभरात त्रुटी दुर करण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात त्रुटी दुर न झाल्यास अग्निशमन दलामार्फत न्यायालयीन कारवाईही केली जाऊ शकते. तसेच वेळ पडल्यास या मॉल्सचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो.

महत्त्वाची बातमी : रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

या मॉल्स मधिल अग्निप्रतिबंधक यंत्रणेतील त्रुटी दुर करण्या बराेबरच बेकायदा बांधकामाचा आढावाही विभाग कार्यालयामार्फत घेतला आहे. स्थायी समितीत वरळीच्या अट्रीया मॉल्समध्ये बेकायदा बांधकाम असल्याचा आरोप केल्यानंतर अग्निशमन दलाने या माॅलचीही पाहाणी केली होती. तेथेही त्रुटी आढळल्यानंतर नोटीस देऊन महिन्याभराची मुदत दिली आहे. तसेच, संबंधीत विभाग कार्यालयालाही बेकायदा बांधकामाची पाहाणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. या वृत्ताला प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दुजोरा दिला आहे.

हे आहेत धोकादायक मॉल्स

शहर विभाग -

 • सीआर टू मॉल, नरीमन पॉईंट
 • सिटी सेंटर मॉल, नागपाडा
 • नक्षत्र मॉल, दादर

पश्‍चिम उपनगर -

 • सुबरीबीआ मॉल वांद्रे
 • ग्लोबस प्रायव्हेंट लिमीटेड वांद्रे
 • रिलायन्स ट्रेंड मेन स्ट्रीट मॉल वांद्रे
 • हाय लाईफ प्रिमायसेस वांद्रे
 • केनिल वर्थ शॉपिंग सेंटर खार
 • मिलन मॉल गार्मेंट हब, सांताक्रुझ
 • रिलायन्स रिटेल लिमीटेड डिजीटल सांताक्रुझ
 • दि झोन मॉल बोरीवली
 • रिलायन्स मॉल शिंपोली बोरीवली
 • गोकूळ शॉपिंग सेंटर बोरीवली
 • देवराज मॉल बिल्डींग दहिसर
 • साई कृपा मॉल दहिसर
 • सेंट्रल प्लाझा, इर्स्टन प्लाझा मालाड
 • दि मॉल मालाड
 • ॲनेक्स माॅल कम थिएटर कांदिवली
 • विष्णू शिवम मॉल कम थिएटर कांदिवली
 • ठाकूर मुव्ही ॲन्ड शॉपिंग मॉल कांदिवली
 • ग्रोवेल मॉल कांदिवली

पुर्व उपनगर -

 • के स्टार माॅल चेंबूर
 • क्युबिक मॉल चेंबूर
 • हायको मॉल पवई
 • ड्रीम मॉल भांडूप


महत्त्वाची बातमी : मुंबई मनपाचे विरोधीपक्षनेते रवी राजा म्हणतात २०२२ च्या निवडणूक स्वबळावर लढवल्या जाव्यात, महाविकास आघाडीत खळबळ ?

महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायद्यानुसार संबंधीत संकुलांमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची दर सहा महिन्यांनी तपासणी करुन प्रमाणपत्र अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर अग्निशमन दल कोणत्याही संकुलांची तपासणी करते. 2019 मध्ये अग्निशमन दलाने 935 संकुलांची तपासणी केली, त्यातील 290 संकुलांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यानंतर त्रुटी दुर न करणाऱ्या 30 संकुलांवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली. तर, 2018 मध्ये 755 संकुलांची तपासणी करण्यता आली. त्यातील 290 त्रुटी आढळल्या. 13 संकुलांमध्ये त्रुटी दुर न केल्या बद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली.  

( संपादन - सुमित बागुल )

twenty nine malls across mumbai are unsafe for visitors read full list of unsafe malls in mumbai  

loading image
go to top