esakal | अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत कट ऑफ कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Online Admission

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत कट ऑफ कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील (colleges) अकरावी प्रवेशाची (eleventh Admission) तिसरी गुणवत्ता यादी (Third merit list) सोमवारी जाहीर झाली. या यादीसाठी अर्ज सादर केलेल्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना (students) प्रवेशापासून वंचित रहावे लागले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत तिसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबईतील नामांकित महाविद्यालयांच्या (Reputed colleges Cut off) कटऑफमध्ये फारसा फरक झालेला नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडे तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष

तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी आँनलाईन अर्ज सादर केलेल्या १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय अलॉट झाले आहेत. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत संबंधित महाविद्यालयमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. मुंबईतील नामांकित महविद्यालयापैकी जयहिंद आर्ट्सचा तर रूपारेल काँलेजच्या काँमर्सचा कटआँफमध्ये कट ऑफ हा या गुणवत्ता यादीत ९१टक्के इतका कायम राहिला आहे..

रूईयाच्या आर्ट्सच्या कटआँफमध्ये पाँईट २ टक्क्यांची घट झाली आहे. तर झेवियर्सचा आर्ट्सचा कटआँफ ९४ वरून ९३.२ टक्क्यांवर आला आहे. डहाणूकरचा काँमर्सचा कटआँफ ९०.२ टक्क्यांवरून ९० टक्के झाला आहे.तर झेवियर्सचा सायन्सचा कटआँफ ९१ वरून ८९.८ टक्क्यांवर आला आहे. यावेळी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७० हजार ४९७ विद्यार्थ्यांचे यादीत नावच आलेले नाही. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या टक्केवारीनुसार नोंदविलेले काँलेज पसंतीक्रम आणि कट ऑफ यात फरक असण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या यादीतील असे झाले प्रवेश

उपलब्ध जागा १,१९, ३३३

प्रवेश अर्ज १,१०,४६१

अलाँटमेंट ३९,९६४

पहिल्या पसंतीचे काँलेज ६९१६

अकरावी शाखानिहाय प्रवेश

शाखा प्रवेशअर्ज अलॉटमेंट

आर्ट्स ८००० ३१५२

कॉमर्स ६७,६७९ २५,५३९

सायन्स ३४,२६० ११,०५८

एचसीव्हीसी ५२२ २१५

loading image
go to top