

Mumbai 20% Hotels Closed
ESakal
मुंबई : रशिया-युक्रेननंतर आता अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे ढग थेट मुंबईतील हॉटेल उद्योगावर घोंगावू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत केवळ वाढच झाली नाही, तर आता प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा भीषण परिणाम मुंबईतील हॉटेल व्यवसायावर झाला असून, सुमारे २० टक्के हॉटेल्सना टाळे लागले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात मुंबईतील खानावळी आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.