
मुंबई, ता. ३०: संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी अत्याधुनिक असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यात येणार आहे. महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून 14 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करून तीन महिन्यात आपला सरकारला अहवाल सादर करणार आहे.
संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी हृदयनाथ मंगेशकर यांची नियुक्ती केली असून, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, सुरेश वाडकर, अजोय चक्रवर्ती, ए. आर. रहमान, शंकर महादेवन, मनोहर कुंटे, निलाद्री कुमार, प्रियंका खिमानी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. समन्वयक म्हणून मयुरेश पै यांची तर सदस्य सचिवपदी कला संचालनालयाच्या संचालकांची नेमणूक केली आहे.
सरकारने नेमलेली ही समिती संगीत महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा, इमारत, वसतिगृह, ध्वनीमुद्रण, कलागृह, सराव कक्ष, साधनसामुग्री इत्यादी पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, आवश्यक अध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना उपलब्ध व्यावसायिक संधी, महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषगांने कामांचे टप्पे आदींचा सखोल अभ्यास करून अंदाजित खर्चाचा अहवाल समितीकडून सरकारला सादर करण्यात येणार आहे.
सर्व घटकांसोबत विचारविनिमय करून सर्व बाबींचा अभ्यास करून समितीला तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. समितीच्या बैठका, समितीमधील अशासकीय सदस्यांचे मानधन व प्रवासभत्ताच्या जबाबदारी मुंबई विद्यापीठावर सोपवण्यात आली आहे.
committee formed to establishment of a music college at university of mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.