Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन


मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व आहार, व्यायाम आदी दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. 
कोरोना काळात औषधांचा वापर प्रामुख्याने संसर्गाचा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व उपचारादरम्यान केला गेला. संसर्ग रोखण्यासाठी स्टेरॉईडने म्हत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच स्टेरॉईडच्या वापरामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले गेले. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते व कोरोना संसर्ग रोखणे हे अधिक महत्त्वाचे होते. 

तसेच, कोव्हिड रुग्ण आयसीयूत गेल्यावर दिले जाणारे रेमडेसिव्हिर व विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी दिले जाणारे फॅविपिरावीर या औषधांच्या अधिक वापरामुळेही रुग्णाला अशक्तपणा जाणवत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या औषधांमुळे रुग्ण बरा होतो; मात्र सोबतच आतून अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. 

रेमडेसिव्हिर या औषधाला अजूनही कोव्हिड उपचारासाठी मान्यता नाही; मात्र औषधाच्या वापराने रुग्णामधील संसर्ग कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉक्‍टरांना निदर्शनास आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. रेमडेसिव्हिरला मान्यता नसली तरी या औषधामुळे रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झाला नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. 

औषधांच्या अधिक डोसमुळे किमान 15 ते 20 दिवस अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दोन आठवड्यानंतर रुग्णांना आहार व इतरदैनंदिन गोष्टीकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते. इतर व्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. 
- डॉ. आकाश खोब्रागडे,
वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Unmasking Happiness Adverse effects of drugs in post covid Doctors urge attention to rest, diet, exercise

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com