
जनता पुन्हा घेऊ शकणार सरकार दरबारी धाव; गृहविभागाचा निर्णय
जगभरात पसरलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तसंच राज्यातही अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागलेले निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता जनतेला सरकार दरबारी धाव घेणं शक्य होणार आहे.

जगभरात परसलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबवण्यात येण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. कोविड १९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात केंद्र शासन आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, तसंच सर्वसामान्य जनतेकडून मंत्रालयात प्रवेश सुरू करण्याची मागणी सातत्याने करत होते. त्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार, मंत्रालयात सर्वसामान्यांना पूर्ववर प्रवेश देण्यात येणार आहे. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबवण्यात येणारी Visitor Pass Management System १८ मे पासून पूर्ववर सुरू करण्यात येणार आहे.
Web Title: Common People Can Directly Go Into Mantralay Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..