esakal | केंद्रीय सशस्त्र दल राज्यात दाखल, मुंबई पुण्याला येणार छावणीचं रूप? पोलिसांचा भार होणार कमी
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय सशस्त्र दल राज्यात दाखल, मुंबई पुण्याला येणार छावणीचं रूप? पोलिसांचा भार होणार कमी

सध्या मुंबई, मालेगाव, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद सारख्या शहरी पट्ट्यात केंद्रीय पथकाची आवश्यकता आहे.

केंद्रीय सशस्त्र दल राज्यात दाखल, मुंबई पुण्याला येणार छावणीचं रूप? पोलिसांचा भार होणार कमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असुन, दमलेल्या पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनच्या काळात निमलष्करी दलांना पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याकडून 20 कंपन्यांची मागणी करण्यात आली होती. त्यातील केंद्रीय राखीव दलाच्या नऊ तुकड्या महाराष्ट्र दाखल झाल्या असून आणखी एक तुकडी मंगळवारी दाखल होणार आहे.

कोरोना संकटाला आळा घालण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 मार्च पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊनचे तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथा लॉकडाऊन 18 मे ते 31 मे पर्यंत लागू राहणार आहे. या चौथा टप्पा हा अतिशय कडक अमलबजावणची असल्याने, राज्य पोलिसांच्या मदतीला निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. तसेच होमगार्डच्या पथकांचीही मदत घेतली जाणार आहे.

बापरे ! कोरोनाची पुन्हा 'नवीन' लक्षणं उघड, WHO ने दिली माहिती, जाणून घ्या कोणती आहेत ही लक्षणं...

मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि नागपूर या महानगरांमधील रेड झोन तसेच कंटेनमेंट झोनमध्ये ही निमलष्करी दले तैनात करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेला तिसरा लॉकडाऊन रविवारी संपला. 18 मे पासून ते 31 मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे.

मात्र, या चौथ्या लॉकडाऊनचे स्वरूप वेगळे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते. केंद्र सरकारचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढविल्याचा आदेश काढला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे स्वरूप राज्य सरकार स्पष्ट करतील असेही सांगितले होते.

मुंबईत कोरोनाची साखळी मोडणार? तिसऱ्या टप्प्यात तब्बल ११ हजार रुग्ण

सध्याची परिस्थिती पाहता रात्रंदिवस बंदोबस्त करून थकलेल्या राज्य पोलिसांच्या मदतीसाठी किमान दोन हजार सीएएसएफच्या जवानांची आवश्यकता आहे. थोडा आराम मिळाल्यानंतर नव्या दमाने पोलिस पुन्हा काम करू शकतील. सध्या मुंबई, मालेगाव, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद सारख्या शहरी पट्ट्यात केंद्रीय पथकाची आवश्यकता आहे. राज्य राखीव पोलिस दल सध्या स्थानिक पोलिसांना मदत करत आहेत

companies of CAPF reached maharashtra police will get some relaxation after 3 moths

loading image