Mumbai News : कंपनी स्थापन होण्यापूर्वीच पालिकेने कंपनीला कामाचा ठेका दिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

Mumbai News :कंपनी स्थापन होण्यापूर्वीच पालिकेने कंपनीला कामाचा ठेका दिला

मुंबई : कंपनी स्थापन होण्यापूर्वीच पालिकेने कोविड सेंटरच्या कामाचा ठेका लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ला दिल्याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला. पालिकेने काहीही खुलासा केला तरी या कामात १०० कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचे सांगत आपल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा सांगितले.

सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे पार्टनर आहेत.त्यांचीच लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी आहे. या कंपनीला १०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले. कोविड सेंटरचयक कामाचे कंत्राट देण्याचा निर्णय पालिकेने २४ जून २०२० रोजी घेतला.परंतु, कंपनी त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २६ जून २०२० रोजी अस्तित्वात आली असे ही सोमैय्या म्हणाले.

कंपनीच्या जन्मापूर्वीच पालिकेने १०० कोटींचे कंत्राट दिले,हे कसे काय असा सवाल सोमैय्या यांनी विचारला आहे. यासाठी कंपनीने वापरलेला कागदपत्र देखील बनावट बनवण्यात आली आहे. हे देखील कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. आपण याचा पाठपुरावा करणार असून हा घोटाळा जनतेसमोर येईलच असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.