पनवेल महापालिका क्षेत्रातही संपुर्ण लॉकडॉऊन रद्द! अटी शर्थींसह अनलॉक होणार

पनवेल महापालिका क्षेत्रातही संपुर्ण लॉकडॉऊन रद्द! अटी शर्थींसह अनलॉक होणार

पनवेल ः महापालिका क्षेत्रात जाहीर करण्यात आलेले लाॅकडाऊन क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोविड-19 विषाणुचा संसर्ग रोखण्याकरिता पनवेल पालिकेच्या वतीने  लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. पालिका कार्यक्षेत्रातील क्लस्टर कंटेन्मेंट झोन व इतर कंटेन्मेंट  क्षेत्रामधील COVID-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता, या कंटेन्मेंट क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन सुरु ठेवणे आवश्यक असल्याने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज मनपाच्या इतर क्षेत्रातील लाॅकडाऊन उठविण्याचे आदेश जारी केले. हे आदेश दि. 22 जुलै 2020 रोजी सकाळी 5 पासून लागू होतील. कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहील.

यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम  तत्वावर चालविण्यास परवानगी असणार आहे.तर एपीएमसी मार्केट व मच्छी मार्केट मात्र बंद राहील.

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com