

Leaders raise slogans demanding submission of the inquiry report into alleged irregularities at Pune Market Committee.
sakal
मुंबई : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळे वाटप, टपऱ्या, पेट्रोल पंप आणि सुरक्षा एजन्सीच्या कंत्राटांमध्ये झालेल्या कथित मोठ्या भ्रष्टाचाराचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला वारंवार मुदतवाढ देऊनही अहवाल सादर न झाल्याने लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. यावर स्पष्टीकरण देताना, ‘येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.