मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु : एकनाथ शिंदे

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु : एकनाथ शिंदे

मुंबई, ता. 23 : राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र आणि राज्याने एकत्र बसून मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. दरम्यान, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन अनुकुलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ही ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. मात्र या जागेसाठी राज्य सरकारविरोधात केंद्र सरकार (खार जमीन आयुक्त) न्यायालयात गेले असल्याने आणि सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील उपस्थित होते.

conflict of metro car shed government is working on searching various options eknath shinde

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com