अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुरू; शुल्क भरले तरी प्रक्रिया अपूर्णच...

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुरू; शुल्क भरले तरी प्रक्रिया अपूर्णच...


मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. मात्र प्रवेशाच्या संकेतस्थळावर पैसे भरलेच नसल्याचे दाखवण्यात येते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा मोठा गोंधळ उडाला असून विविध प्रकारची संमतीपत्रासाठी अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना सायबरकॅफेची वाट धरावी लागत असल्याने यंदाही प्रवेशातील गोंधळ कायम असल्याचे दिसत आहे.

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरूवात करताच प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प झाले. काही वेळानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्याचा वेग खूपच कमी होता. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी चार ते सहा तास खर्ची करावे लागले. रविवारीही वेबसाइट खूपच मंद गतीने सुरू होती. एवढा वेळ खर्च करून भरलेल्या अर्जानंतर 225 रुपये प्रवेश प्रक्रिया शुल्क विद्यार्थी भरतात. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचे मेसेज आले. पण संकेतस्थळावर मात्र पैसे जमा न झाल्याचे दाखवत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना याबाबत तक्रार निवारणासाठी कोणतीही हेल्पलाइन अथवा विशेष कक्ष नसल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. या प्रक्रियेत यंदा कागदपत्रेही ऑनलाइन सादर करावयाची असल्याने सर्व्हरवर ताण येत आहे. मात्र त्याची क्षमता कमी असल्याने वेग मंद होत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

संकेतस्थळासाचा वेग वाढून येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या पालकांचे शुल्क कट होईल, पण अर्जावर ते भरले नसल्याचे दाखवत असल्यास ते पैसे पालकांना परत मिळतात. काही पालकांनी एकदा झाले शुल्क भरून झाले नाही म्हणून दोनवेळा पैसे भरले त्यांना त्यांचे अतिरिक्त पैसे परत दिले जातील. 
- राजेंद्र अहिरे,
शिक्षण उपसंचालक, मुंबई

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com