मुंबई मनपा कामगार आणि कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा सुटला, सोमवारी होऊ शकते मोठी घोषणा

समीर सुर्वे
Saturday, 31 October 2020

मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा सुटला आहे. महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी सानुग्रह अनुदान जाहीर करणार आहेत

मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्व कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते दिवाळी बोनस चे. एकीकडे अनेकांचं आर्थिक गणित बिघडलंय तर दुसरीकडे अनेक संस्थांचेही यंदा कोरोनामुळे मोठं नुकसान झालंय. अशा खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनसची अपेक्षा ठेवावी की ठेवू नये हा देखील प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झालाय.      

दरम्यान मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा सुटला आहे. महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी सानुग्रह अनुदान जाहीर करणार आहेत. कर्मचारी कामगारांच्या समन्वय समितीने आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाची बातमी : राज्यपाल विरुद्ध राज्य, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता; आमदार नियुक्तीसाठी कडक नियम?

मुंबई महागरपालिका कर्मचार्यांसाठी अर्थलंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार 17 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार होते. मात्र,कोविड काळात कर्मचार्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन 40 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळावा अशी मागणी समन्वय समितीने केली होती.

तरतुदींपेक्षा जास्त अनुदान द्यायचे झाल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल असे आयुक्त इक्बाल सिह चहल यांनी  सांगितले होते. त्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम निमंत्रक ऍडव्होकेट प्रकाश देवदास यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावर सोमवारी महापौर अनुदान जाहीर करतील असे आश्वासन मुखमंत्र्यांनी दिले. यावेळी महापौर पेडणेकर, आयुक्त चहल, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थीत होते.

( संपादन - सुमित बागुल )

confusion related to bonus of BMC workers sorted announcement might happen on monday 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: confusion related to bonus of BMC workers sorted announcement might happen on monday