

Congress Corporators Join BJP
ESakal
वाशी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाच्या ११ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर विजयी झालेले कबीर गायकवाड यांनी मात्र आपला अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी समाजमाध्यावर म्हटले आहे.