Congress and Vanchit Bahujan Aghadi contesting against in mumbai
ESakal
मुंबई
BMC Election: वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला हिसका! 5 जागांवर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहणार
Municipal Corporation Election: मुंबई पालिकेत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईतील पाच जागांवर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर मुंबई पालिकेत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युती झाली खरी; मात्र या युतीमधील कटकटी थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुंबईतील पाच जागांवर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहणार असल्याचे आज (ता. २) स्पष्ट झाले. गेल्या पालिका निवडणुकीत यातील तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस नेते खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलीला वंचितने आव्हान दिले आहे.

