esakal | मुंबई काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा गौरव; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Congress

मुंबई काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा गौरव; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्षा माधवी राणे (Madhavi Rane) यांच्या गोरेगावातील जनसंपर्क कार्यालयाच्या (Goregaon PRO Office) उद्घाटनप्रसंगी (inauguration) गुरुवारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (bhai jagtap) यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना (corona Warriors) गौरविण्यात आले.

हेही वाचा: 'KDMC' महापालिका आयुक्त केवळ शिवसेनेची कामे करतात; राष्ट्रवादीची टीका

याप्रसंगी गोरेगावमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. गोरेगावात कोरोनाकाळात समाजसेवा करणाऱ्या डॉक्टर, पत्रकार व स्वयंसेवी संघटना, एनजीओचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी रुबीना पठाण, दत्तात्रय जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गोरेगावमधील अनेक रुग्णांचे जीव डॉक्टरांनी वाचवले. त्यांनी स्वतःहून रुग्णांच्या घरी जाऊन चांगली सेवा दिली. त्यामुळे अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणे हे माझे भाग्य आहे, असे माधवी राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, मुंबई सरचिटणीस भावना जैन, मुंबई उपाध्यक्षा जेनेट डिसोझा, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, जिल्हा कार्याध्यक्ष व माजी आमदार अशोक जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये प्रवेश

मोतीलाल नगर येथे असलेल्या या जनसंपर्क कार्यालयातून आता खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद केला जाईल, असे उद्गार भाई जगताप यांनी यावेळी काढले. यावेळी भाजपचे भास्कर गायकवाड, सचिन मुरुडकर, वाहीद खान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष वाघमारे, अहमद शेख आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची अवस्था बळकट झाल्याची प्रतिक्रिया वॉर्ड अध्यक्ष गौरव राणे यांनी व्यक्त केली.

loading image
go to top