esakal | 'KDMC' महापालिका आयुक्त केवळ शिवसेनेची कामे करतात; राष्ट्रवादीची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

KDMC

'KDMC' महापालिका आयुक्त केवळ शिवसेनेची कामे करतात; राष्ट्रवादीची टीका

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील गोळवली येथे गेले वर्षभर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणचे (concrete road) काम शिल्लक आहे. येथे सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार होऊन रोगराई (Decease) पसरण्याची शक्यता आहे. येथील पाण्याच्या पाईपलाईनचे काम (pipeline work) शिल्लक असल्याने रस्त्याचे काम झाले नाही. मात्र पालिकाप्रशासन (KDMC) त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने राष्ट्रवादी (NCP) युवक जिल्हाध्यक्ष यांनी 'ऑलम्पिक (Olympic) मध्ये जर खराब रस्त्यांची स्पर्धा असती तर...' असा आशय असलेले फलक लावत पालिका प्रशासनावर झोड घेतली आहे. पालिका आयुक्त (Municipal Commissioner) हे केवळ शिवसेनेची कामे करतात, असा आरोप युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील (sudhir patil) यांनी केला आहे.

हेही वाचा: 'पाप केले की कोरोना होतो'; संजय राऊतांच्या विधानाचा भाजपकडून समाचार

कल्याण शीळ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. गोळवली गावाजवळ हे काम अर्धवट अवस्थेत आहे. ही कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी एमएसआरडीसी कडे केली. याठिकाणी पाण्याची पाईपलाईन असून कल्याण डोंबिवली पालिकेने पाण्याच्या लाईन खाली केल्यास हे काम पूर्ण करण्यात येईल असे उत्तर एमएसआरडीसी दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याप्रकरणी एमआयडिसी व पालिका पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पावसाळ्यात यामध्ये पाणी साचून डबके साचले आहे. येथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. गेल्या वर्षभरापासून येथील नागरिक त्रस्त असून अखेर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हा फलक रविवारी लावला आहे. फलकांची सिरीजच आम्ही करणार आहोत. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे पालिकेत बसून शाखा चालवित आहेत असे वाटते. ते सेनेचे काम करतात की सर्वसामान्य जनतेचेतेच कळत नाही. झोपलेले प्रशासन जागे न झाल्यास रस्त्यावर उतरून आयुक्तांना घेराव घालीत ऑलम्पिक चे विजेते पदक त्यांच्या गळ्यात घालू असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top