esakal | बैलगाडी कोसळल्यानंतर भाई जगताप यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Bhai-Jagtap-bullock-cart

बैलगाडी कोसळल्यानंतर भाई जगताप यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले...

sakal_logo
By
विराज भागवत

भाजपच्या नेत्यांनी काल जगताप यांची उडवली होती खिल्ली

मुंबई: काँग्रेसने (Congress) शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा (Mumbai Morcha) काढला. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices Hike) वाढत्या किंमतींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Congress Workers) या मोर्चासाठी खास बैलगाडी (bullock cart) आणली होती. बैलगाडीवर उभे राहून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापही बैलगाडीवर उभे होते. पण अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या वजनामुळे बैलगाडीच तुटली आणि सर्व जण खाली पडले. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींनी त्यावरून भाई जगताप यांची खिल्ली उडवली. त्या खिल्लीला भाई जगताप यांनी चोख प्रत्युत्तर दिले. (Congress Bullock Cart break down Viral Video Bhai Jagtap slams BJP)

हेही वाचा: 'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! प्रसाद लाड यांची काँग्रेसवर खोचक टीका

काँग्रेसच्या या बैलगाडी मोडण्याच्या घटनेनंतर भाजपकडून यावर खिल्ली उडवण्यात आली. "गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंचं करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जीवांचा विचार करावा!'", अशा शब्दात आमदार प्रसाद लाड यांनी खिल्ली उडवली. तर, 'तोल सांभाळा ⁦भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे, याचा आधीच विचार करा", असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

त्यावर, भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर आज देशाची स्थिती अशी झाली नसती….", अशी सडेतोड प्रत्युत्तर भाई जगताप यांनी दिले.

हेही वाचा: "सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान..."

नक्की काय घडलं?

अँटॉप हिल येथे बैलगाडीत उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते गॅस सिलेंडर, इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी बैलगाडीवर बरेच कार्यकर्ते एकत्र उभे राहिले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. भाई जगताप यांना साथ देण्यासाठी आणखीही काही कार्यकर्ते बैलगाडीवर चढले. त्यांचा भार सहन न झाल्याने बैलगाडी मोडून पडली. भाई जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते जमिनीवर कोसळले.

loading image