esakal | 'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! प्रसाद लाड यांची काँग्रेसवर खोचक टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! प्रसाद लाड यांची काँग्रेसवर खोचक टीका

'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! प्रसाद लाड यांची काँग्रेसवर खोचक टीका

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: आज काँग्रेसने (cogress) मुंबईत मोर्चा (Mumbai morcha) काढला होता. पेट्रोल-डिझेलच्या (petrol price hike) वाढत्या किंमतींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (congress workers) या मोर्चासाठी खास बैलगाडी (bullock cart) आणली होती. बैलगाडीवर उभे राहून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. भाई जगतापही बैलगाडीवर उभे होते. पण मोर्चेकरांच्या वजनाने चक्क बैलगाडीच तुटली. (Today bullock cart break in congress rally bjp prasad lad & Keshav Upadhye slam congress)

अँटॉप हिल येथे बैलगाडीत उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते गॅस सिलेंडर, इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. बैलगाडी मोडून पडण्याच्या या घटनेवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी अत्यंत खोचक शब्दात काँग्रेसवर टीका केली आहे. 'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! असं प्रसाद लाड यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: हॉस्पिटलमध्येच डॉक्टरचा नर्सवर जबरदस्तीचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील घटना

"भाई जगताप, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!"असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!" अंस लाड यांनी म्हटलं आहे. भाई जगतापही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ते मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत.

हेही वाचा: दोन महिलांना १ कोटी रुपयांना फसवणाऱ्या ज्योतिषी राम करंदीकरला अटक

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुद्धा खोचक शब्दात टीका केली आहे. "महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा" अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

loading image