महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रतीत सत्तास्थापनेच्या हालचाली अतिशय वेगवान घडताना दिसतायत.  अशातच आता  कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय.  कॉंग्रेस हायकमांडची दिल्लीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्याशी चर्चा होतेय यात काँग्रेसला 14 मंत्रीपदं देण्याची मागणी केली जातेय अशी माहिती  उच्चस्तरीय सूत्रांकडून येतेय. याचसोबत राज्यात दोन उपमुख्यमंत्री असावेत अशी देखील मागणी केली जाणार आहे अशी देखील माहिती आता सूत्रांकडून समोर येतेय. 

कॉंग्रेसने  जर शिवसेनेला आतून पाठींबा दिला, जर कॉंग्रेस महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी झाला तर महाराष्ट्रात एक मुखमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येत्या काळात बघायला मिळू शकतात अशी शक्यता सूत्राकडून वर्तवण्यात. 

मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. तब्बल 50 मिनिटं ही चर्चा झाली. अशातच आता महाराष्ट्रातील नवी राजकीय गणितं कशी असतील याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर शरद पवार हे Y B चव्हाण सेंटर मध्ये सर्व आमदारांची चर्चा करून माध्यमांशी बोलणार आहेत.  दरम्यान दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्य नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर कॉंग्रेसचे  महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

 ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होवोत ! होमहवन, अभिषेक सुरु

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्णत्वाकडे जात असल्याने तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होवोत यासाठी कराड येथील शिवसैनिकांनी कृष्णा घाटावरील श्री. रत्नेश्वर मंदिरात होमहवन व अभिषेक केला. यावेळी शेकडाे शिवसैनिक उपस्थित होते.

Webtitle : congress demands 14 ministries and 2 deputy cm post in maharashtra says sources  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress demands 14 ministries and 2 deputy cm post in maharashtra says sources