

Congress unveils plan for BEST
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमासाठी आपला स्वतंत्र आणि क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘बेस्ट ही नफा कमावणारी संस्था नसून, ती सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक सेवा आहे,’ असे ठाम प्रतिपादन करीत काँग्रेसने बेस्टच्या संपूर्ण कायापालटाची ‘ब्लू प्रिंट’ सादर केली.