आता 10 पट अधिक वेगाने लढणार : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 July 2019

अध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात मी माझे सर्व विचार पत्रात स्पष्ट केलेले आहेत. ही विचारधाराची लढाई आहे. मी गरिब, शेतकरी, मजुरांच्यासोबत उभा आहे. ही लढाई लढण्यासाठी मजा येत आहे. ही लढाई सुरुच राहील. गेल्या पाच वर्षांपेक्षा 10 पट अधिक वेगाने आता ही लढाई लढणार आहे. 

मुंबई : मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी विचारांची लढाई सुरुच राहणार आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या लढाईपेक्षा 10 पट अधिक वेगाने विचारांची लढाई लढणार आहे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले, की अध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात मी माझे सर्व विचार पत्रात स्पष्ट केलेले आहेत. ही विचारधाराची लढाई आहे. मी गरिब, शेतकरी, मजुरांच्यासोबत उभा आहे. ही लढाई लढण्यासाठी मजा येत आहे. ही लढाई सुरुच राहील. गेल्या पाच वर्षांपेक्षा 10 पट अधिक वेगाने आता ही लढाई लढणार आहे. 

कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप असलेल्या मानहानीच्या दाव्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज (गुरुवार) शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिल्यानंतर मी दोषी नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी राजीनामा मागे घेण्यासाठी घोषणा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi says will fight continue against BJP and RSS